रविवार, १३ जानेवारी, २०१९

सुटाबुटातील आम्ही....

जि प शाळा संतोषनगर ता.रोहा,जि.रायगड चे विध्यार्थी

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे....

विंदा करंदीकरांच्या कवितेच्या या चार ओळी खूप काही सांगून जातात. माझी शाळा एक कातकरी आदिवासी वस्तीवरील.शाळेत येणाऱ्या मुलांची परिस्थिती खूप गरीब.सर्व पालक मोलमजुरी करून आपले घर चालवणारे. दररोजचा दिवस कसा जाईल याचीच काळजी तरीपण आपले मुलं शिकली पाहिजेत हि त्यांची धडपड नेहमी जाणवते. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात एक देवदूतासारखा व्यक्ती  500 km नाशिक वरून आमच्या शाळेला भेट द्यायला येतो काय व अनाथांचा नाथ बनतो काय हे सर्व स्वप्नवतच होते. #श्री_गोविंद_चौधरी त्या व्यक्तीचे नाव. एक उद्योजक पण गरिबी काय असते ते अनुभवून संघर्षातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व. आमच्या संतोषनगर शाळेची बातमी झी 24 तास वर पाहिली व नाशिकवरून थेट संतोषनगर  गाठले.शाळेतील मुलांची शिकण्याची जिद्द पाहिली, त्यांच्या झोपड्यांना भेटी दिल्या व परिस्थिती पाहून त्यांना स्वतःचे दिवस आठवले व त्यांनी शाळेतील सर्व मुले दत्तक घेतली. वंचीत मुलांना देवदूत भेटला असे वाटले.वर्षभरात चौधरी साहेबांनी अनवाणी पायांना उन्हाळ्यात मुलांना चप्पल,जून मध्ये दप्तरे, ऑगस्ट मध्ये शाळा डिजिटल,दर महा शिष्यवृत्ती देऊन मुलांचे पालकत्व स्वीकारले.एका वर्षभरात जवळपास 90000 रु मदत मुलांना केली.
नववर्षाच्या सुरवातीला मुलांना त्यांनी स्पोर्ट्स ड्रेस व शाळेचे बूट पाठवून दिले. आमच्या मुलांनी असले बूट, रंगीत स्पोर्ट्स ड्रेस फक्त आगोदर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगात व पायात पाहिले होते.पण ह्याच वस्तू आपल्याला मिळणार म्हटल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.पहिल्यांदाच त्यांना शाळेचे बूट व खेळाचे ड्रेस घालायला मिळणार होते.मुलांचे ते हास्य व आनंद जणू एखादा वर्ल्डकप जिंकलेल्या टीम सारखा वाटत होता. पालकांना ही आपल्या मुलांनी ड्रेस व बूट घातल्यास कौतुक वाटत होते व त्यांचा आनंद चेहऱ्यावर लपत नव्हता.
हे सर्व चौधरी साहेबांच्या दातृत्वामुळे शक्य झाले.समाजात अनेक गर्भश्रीमंत आहेत ,अनेक जण लग्न,वाढदिवसावर करोडो खर्च करत असतात पण जर अशीच मदत वंचीत घटकातील मुलांना केली तर त्यांना करोडो खर्च करून जेवढा आनंद मिळणार नाही तेवढा आनंद व समाधान अशा गरजू मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मिळेल.श्री चौधरी साहेबांसारखे मदतीचे हात प्रत्येक गरजू मुलांपर्यंत पोहचावेत हीच अपेक्षा.



व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...