सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

शिक्षक ते अधिव्याख्याता एक प्रेरणादायी प्रवास प्रा.संतोष दौंड

प्रा.श्री संतोष दौंड(अधिव्याख्याता, DIECPD PANVEL)

प्रबळ इच्छाशक्ती असली की कोणतेही ध्येय अवघड नसते हे अनेकांचे व्यक्तिमत्व पाहिल्यास समजते.पण असे कांही व्यक्तिमत्व असतात की त्यांचा सध्याचा हुद्दा फक्त आपणास दिसतो पण त्या व्यक्तीचा संघर्ष काय असतो हे त्या व्यक्तीला समजून घेतल्या शिवाय समजत नाही.असेच एक व्यक्तिमत्व मला भेटले व त्यांच्याबद्दल लिहण्याची इच्छा झाली.पनवेल DIECPD(डायट) चे अधिव्याख्याता प्रा.संतोष दौंड यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ते वर्ग 2 अधिकारी प्रवास  कसा झाला हे त्यांच्या दोन दिवसांच्या एका कार्यशाळेत समजून घ्यायला मिळाला....
प्रा.संतोष दौंड यांचा जन्म अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील कोनोशी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची ,वडील शेतात कष्ट करायचे व घरगाडा चालवायचे.सर्वसामान्य शेतकरी मुलांप्रमाणे संतोष यांचे प्राथमिक शिक्षण ही जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना शेजारच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे जावे लागले.लहानपणा पासूनच शिक्षणाची आवड,सतत नाविन्याचा ध्यास,जिद्द,मेहनत करण्याची अंगभूत क्षमता या उपजत गुणामुळे संतोषने कधी पहिला नंबर सोडला नाही. दहावी नंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी शेवगाव येथील न्यु आर्ट्स अँड कॉमर्स ,सायन्स महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. महाविध्यालयीन वय हे भविष्याचे स्वप्न पाहण्याचे असते त्या प्रमाणे संतोषचे ही डॉक्टर होण्याचे स्वप्न होते व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसे त्यांचे प्रयत्न सुरु ही होते पण थोडक्या गुणामुळे डॉक्टर होण्याची संधी चुकली व त्यांना थोडी निराशा आली पण त्यांनी जिद्द सोडली नाही.पुढे त्यांना bsc, msc करण्याची खूप इच्छा होती पण त्याच बरोबर घरच्या जबाबदाऱ्या ही खूप होत्या बहिणींचे शिक्षण,त्यांचे लग्न अशा जबाबदारीमुळे घरच्यांच्या इच्छे खातीर त्यांनी ded केलं व तेथे ही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी दबदबा कायम ठेवला.
वडिलांना हातभार लागावा म्हणून त्यांनी ded केलं व पहिल्याच यादीत त्यांना शिक्षक पदाची नोकरी रत्नागिरी जिल्ह्यात भेटली,संगमेश्वर तालुक्यात त्यांनी अतिदुर्गम भागात नोकरी सुरु केली.पण त्यांचे स्वप्न खूप मोठे होते सतत शिक्षण घेण्याची भूक कांही केल्या कमी होत नव्हती.स्पर्धा परीक्षा देऊन काहीतरी करून दाखवण्याची त्यांची जिद्द होती व त्याने प्रेरित होऊन त्यानी दीड वर्षातच नोकरीचा राजीनामा दिला पण घरच्यांना त्यांचा निर्णय पटला नाही. घरच्या जबाबदाऱ्या खूप होत्या व त्यात नोकरी सोडून शिक्षण घ्यायचे म्हणजे तारेवरची कसरत होती पण जिद्द सोडली नव्हती.कांही कालावधी नंतर त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला व रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून 2003 मध्ये ते रुजू झाले त्यांना कर्जत तालुक्यातील बारणे शाळा भेटली. जे जे स्वप्न पहात होते ते एक एक करून अपयशी होत होते पण आत्मविश्वास एवढा होता की परत परत तो ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रेरित करत होता.12 वी नंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले होते पण शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर तर नक्की होणार हे त्यांनी 2003 साली ठरवलं होतं. ठरवणं सोपं असत पण ते राबवणं खूप कठीण असत पण संतोषने त्या मार्गाने पाऊले टाकायला सुरवात केली होती. शिक्षण सेवक म्हणून नोकरी लागलेली शाळा करत करत शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले होते पण सर्व सोंग घेत येतात पण पैशाचे नाही. त्यावेळी त्यांना 3000 पगार होती त्यात दोनाचे चार हात झालेले घरची परिस्थिती बेताची अशा सर्व अडचणीतून मार्ग काढीत त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे होते पण संतोष खूप जिद्दी व ध्येयाने प्रेरित झालेला व्यक्ती होता. कर्जत वरून दररोज 7 km शाळेला सायकलीवर ये जा करून उरलेल्या वेळात अभ्यास करून एक एक पदवी मिळवायची अस संतोषचे ठरले होते. पण कधी कधी हे सर्व कसरत पगारात भागत नव्हती मग त्याने एका संगणक सेंटरवर  2 तास काम सुरु केले व आलेल्या पैशातून शिक्षणासाठी लागणारा खर्च भागवला तर कधी शिक्षणासाठी पत्नीचे दागिने विकण्याची वेळ आली पण शिक्षण थांबू दिले नाही.
असा खडतर प्रवास करत करत BA, MA, DSM, MCJ, M.ED,M.PHIL, SET, NET अशा अनेक पदव्या मिळवल्या व सध्या जे त्यांचे स्वप्न होते डॉक्टर होण्याचे ते phd ते करत आहेत.त्यांनी 2003 पासून ठरवलं होतं की एकही वर्ष वाया घालायचं नाही व सतत शिकत राहायचं. जवळपास 15 वर्षात त्यांनी 10 ते 12 पदव्या मिळवल्या व त्या ही अव्वल नंबर ने.या दरम्यानच्या काळात आपल्या शाळेची गुणवत्ता सांभाळत,आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देत,त्यांनी स्वतःची स्पर्धा परीक्षा देने सुरु केले त्यांना अनेकदा अपयश आले पण जिद्द कांही सोडली नाही. शेवटी 2015 साल हे त्यांच्या मेहनतीला फळ देणारे ठरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अधिव्याख्याता पदासाठी त्यांनी परीक्षा दिली व ते यशस्वी झाले. सतत मेहनत,चिवट जिद्द, आत्मविश्वास याच्या बळावर त्यांना यश संपादित झाले व त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीची ही मोलाची व खम्बीर साथ आहे.
एक जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर काय करू शकतो हे संतोष सरांच्या खडतर प्रवासाच्या यशा नंतर समजते.अखेर 2018 साली संतोष सरांना त्यांच्या निवड झालेल्या पदावरचे आदेश मिळाले व त्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील डायटला अधिव्याख्याता पदावर झाली. आपण एखाद्या ठिकाणी शिक्षक म्हणून सुरवात करावी व त्याच कर्मभूमीत एक तप खडतर तपश्चर्या करून त्याच ठिकाणी पुढल्या मोठ्या कामाची संधी मिळावी यासारखी संधी दुसरी कोणती असू शकते.
संतोष सरांनी 2003 ते 2018 पर्यँत शिक्षक म्हणून मर्यादित शाळेपुरते कार्य केले होते आज त्यांना रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात अधिकारीरुपात सेवेची संधी मिळाली आहे. त्यांनी त्या प्रमाणे कार्य सुरूही केले आहे वेगवेगळ्या तालुक्यात भेटी देऊन तेथील शिक्षकांशी संवाद साधणे,विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे कार्य सुरू आहे. जिल्ह्यात होणाऱ्या अनेक प्रशिक्षणात,कार्यशाळेत शिक्षकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य दौंड सरांच्या माध्यमातून होत आहे. एका कार्यशाळेत त्यांचे दोन दिवस मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली व स्वतःत वेगळा आत्मविश्वास येऊन गेला. सतत आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा,मेहनत यांच्या बळावर अशक्य असे काहीच नाही हे शिकायला मिळाले.
आपल्या समोर प्रा.श्री.संतोष दौंड यांचा खडतर प्रवास मांडायचा हेतू एकच की एखाद्या व्यक्तीच्या वर्तमानातील स्थिती मागे किती कष्ट असतात हे जेव्हा समजते तेंव्हा ते व्यक्तिमत्व निश्चितच प्रेरणादायी होते.....
✍🏻....
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
प्रा.शिक्षक,रायगड जिल्हा परिषद
09923313777
gajanan.jadhav1984@gmail.com

३२ टिप्पण्या:

  1. प्रेरणादायी व्यक्तिमत्व खूप जवळून पाहता आले

    उत्तर द्याहटवा
  2. दौंड सर खूपच जबरदस्त व्यक्तिमत्व

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तम व आत्मविश्वास देणार व्यक्तिमत्व मी शिक्षक या जबाबदारीची जाणीव देणार.

    उत्तर द्याहटवा
  4. सरजी
    खडतर प्रवासावर मात कशी करतात हे तुमच्या कडून शिकावे
    तुमच्या कार्याला माझा सलाम

    उत्तर द्याहटवा
  5. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची शिक्षणखात्याला गरज आहे.तुमच्या जिद्दीला सलाम

    उत्तर द्याहटवा
  6. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची शिक्षणखात्याला गरज आहे.तुमच्या जिद्दीला सलाम

    उत्तर द्याहटवा
  7. दोंड सर खूप प्रभावी व्यक्तीमत्व आहे तुमचे,प्रेरणा मिळाली उत्तम काम करण्यासाठी.संघर्षमय प्रवासाला सलाम.

    उत्तर द्याहटवा
  8. प्रेरणादायी व्यक्तीमत्व कष्ट व अथक परिश्रम यास सलाम

    उत्तर द्याहटवा
  9. आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्व सर

    उत्तर द्याहटवा
  10. आपण सर्वांनी लेख वाचला व त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार

    उत्तर द्याहटवा
  11. प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्त्व, मा.प्राध्यापक श्री.संतोष दौंड सर,आपल्या मेहनतीला, कार्याला सलाम.

    उत्तर द्याहटवा
  12. प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्त्व, मा.प्राध्यापक श्री.संतोष दौंड सर,आपल्या मेहनतीला, कार्याला सलाम.

    उत्तर द्याहटवा
  13. खरोखरच खूप प्रेरणादायी प्रवास✌✌✌✌✌✌💯

    उत्तर द्याहटवा
  14. सर अतिशय सुंदर शब्दांत आपण सर यांच्याबद्दल लिहिले दौंड सर म्हणजे अप्रतिम असे व्यक्तिमत्व त्याना मनापासून सलाम

    उत्तर द्याहटवा
  15. Daund is a gem of raigadh Education department... I loved his lectures...

    उत्तर द्याहटवा
  16. Respected Daund sir is a gem of Raigadh Education department..... I loved his lectures at kolad techers training....

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...