मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

रास...

बळीराजाची रास...

वर्षभर कष्ट करून प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या दिवसाची आतुरता असते तो दिवस म्हणजे रासीचा. जशी शाळेतील विध्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करून परीक्षा देऊन काय निकाल लागेल याची आतुरता असते त्या पेक्षा कैक पटीने बळीराजाला आपण निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत अनेक चढ उतार पाहत रक्ताच पाणी करत जे पीक पिकवल असत त्या पिकाची रास करताना किती माल होईल व त्याला किती भाव लागेल याची आतुरता असते.
जसे एखादा विध्यार्थी खूप मेहनत करून अभ्यास करतो पेपर सोडवतो व त्याला निकालाच्या  दिवशी जशी उत्सुकता लागते तशीच उत्सुकता शेतकऱ्याला आपला माल बाजारात विक्रीसाठी घेऊन गेल्यास काय भाव लागेल या मध्ये असते.
पण वर्षभर ढोर मेहनत करणारा शेतकरी,आपल्या पोरापेक्षा पिकाला जपणारा शेतकरी आपल्या मालाचा लिलाव कांही मिनिटात व्यापारी बोली लावून करतात त्यावेळी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा चेहरा खूप कांही सांगून जातो.
जसे जसे व्यापारी मालाचा भाव करतात तशी शेतकऱयांची धाकधूक वाढत असते त्यांना खूप वाटत आपल्या मालाला चांगला भाव लागावा पण त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात कांही नसत, ते खरेदी करणारे व्यापारी जे ठरवतील तो भाव त्याला मान्य करावाच लागतो मग जो व्यापारी ठरवतील त्या भावात माल घालायचा व समाधान मानत निघायचं एवढाच पर्याय असतो.
आपल्या मालाचा जसा जसा लिलाव होत असतो तसा तसा त्या बळीराजाच्या समोरून नांगरणी,पेरणी,खुरपणी,फवारणी,कापणी व नंतर रास यासाठी किती मेहनत,खर्च लागला ते ओझरता प्रवास निघून जातो.
उन्हाळ्यात शेत नांगरणी त्यानंतर खत ,बियानासाठी सावकाराचे टक्केवारीत पैसे घेणे,पेरणीची तयारी करणे,पावसाची वाट पाहणे,थोडा पाऊस पडला की पेरणीची तयारी करणे,पेरल्यानंतर   चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणे,थोडा पाऊस पडला की समाधान व्यक्त करणे, खुरपणी,फवारणी करणे, त्यात अतिवृष्टी झाली की मग हातात आलेलं पीक गमवायची भीती,सतत धाकधूक,उरलं सुरलं हातात आलेलं पिकाची रास करणे व आलेला मालाला एक सन्मानजनक भाव भेटेल या आशेने आपला माल विकायला घेऊन जाने व त्या ठिकाणी जेव्हा वर्षभराच्या मेहनतीचा भाव कांही व्यापारी एका क्षणात करतात तेव्हा मूग गिळून गप्प बसणं एवढंच शिल्लक राहत.
एवढं होऊन ही बळीराजाची तक्रार बिलकुल नसते पण कांदा 100 रु किलो झाला की लगेच ग्राहकांना मिरच्या झोंबतात त्याचा गवगवा होतो व शेतकऱ्याच्या अच्छे दिनाला कांही दिवसातच दीन स्वरूप येत.
ज्या दिवशी आपण पिकवलेल्या मालाचा भाव शेतकरी स्वतः ठरवेल,त्याला शेतमालाला सन्मानजनक भाव लागेल त्याच दिवशी बळीराजा सुखावेल अस वाटत.
शेतकऱ्याने अनेक संकटाला मात करत फुलवलेला शेती

पिकाची कापणी करून जमा केलेला ढीग

मशीनवर सोयाबीन रास

मालाचे पोते भरताना

निघालेला माल विकण्यासाठी बाजारात

लिलावाच्या प्रतीक्षेत माल

शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाचा लिलाव करताना व्यापारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...