गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

अन् आम्ही ग्रहण पाहिले

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण तायडे व डॉ.महादेव पालक विध्यार्थ्यांना सूर्य ग्रहण दाखवताना
आज तब्बल 10 वर्षानंतर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार होते तेव्हा महाराष्ट्रा सह दक्षिण भारतातील खगोलप्रेमींना आजची पर्वणी ठरणारी होती. राज्यातील अनेक नामांकित शाळा,महाविद्यालयात ग्रहण पहाण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती पण माझ्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासीवाडी शाळेवर ग्रहण पाहणे हे स्वप्नच होते पण खगोल शात्रज्ञ डॉ.विशाल कुंभारे यांच्या मिशन अस्ट्रोनॉमी या संस्थेने ही संधी आमच्या शाळेसाठी उपलब्ध करून देण्याचे ठरवले व आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.कारण ही तसेच होते ग्रहण पाहण्यासाठी लागणारे लेन्स गॉगल आमच्याकडे उपलब्ध नव्हते व ते विकत घेणे ही परवडणारे नव्हते पण संस्थेचे संचालक डॉ महादेव पालक यांच्या प्रयत्नाने आज आमच्या शाळेतील विध्यार्थ्यांना व ग्रामस्थांना ग्रहण पाहण्याची संधी मिळणार होती.व आजच्या कार्यक्रमाला कोलाड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण तायडे यांना व डॉ श्याम लोखंडे यांना निमंत्रित केलं होतं.
आज सकाळ पासून पाऊस सुरु असल्याने वाटलं आता आपल्या आनंदावर विरजण पडणार कारण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणासह राज्यात ढगाळ वातावरण झालं होतं मग अशा वेळी ग्रहण पाहणे शक्य नव्हतं.
आज सकाळी डॉ.पालक सरांना भेटलो व म्हटलं की आता काय करायचं तर सर बोलले आम्ही येऊ तुमच्या शाळेत व मुलांना भेटू.ठरल्या प्रमाणे डॉ.पालक सर,डॉ.श्याम लोखंडे,श्री.तायडे साहेब वेळेत उपस्थित राहिले.समाज मंदिरात सर्व विध्यार्थी व ग्रामस्थ हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी आतुर झाले होते पण ढगाळ वातावरणात सूर्य दर्शन होत नव्हते.पण कांही मिनिटांसाठी सकाळी 10 च्या सुमारास सूर्य ढगातून बाहेर आला व आमच्या मुलांची इच्छा पूर्ण झाली मग काय सर्व मुले,ग्रामस्थ,प्रमुख पाहुणे या सर्वांनी सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला.
या वेळी डॉ.महादेव पालक,श्री तायडे साहेब(सहाय्यक पोलीस निरीक्षक),श्री प्रमोद चवरकर (केंद्र प्रमुख येरळ) यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तायडे साहेब,रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री दयाराम पवार साहेब,डॉ.श्याम लोखंडे,डॉ.महादेव पालक चिंचवली तर्फे आतोणे चे माजी सरपंच श्री नाना शिंदे,केंद्र प्रमुख श्री प्रमोद चवरकर सर,ग्रा.प सदस्य संगीता पवार,श्री राम जाधव श्री भोसले सर,जगन्नाथ जाधव,प्रसाद पालक,श्री तडवी पोलीस कर्मचारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.






३ टिप्पण्या:

  1. खूप चांगला प्रयत्न जाधव सर , आपल्या प्रयत्नांना यश येवो आणि दुर्गम भागातील या समाजाच्या मनातील ग्रहणा बद्दल च्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात ,well done

    उत्तर द्याहटवा
  2. अश्याच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळेल.

    उत्तर द्याहटवा

व्यक्तीरेखा - वर्गातील 22 विध्यार्थ्यांना नवोदयला लावणारा जिल्हा परिषदेचा ध्येयवेडा शिक्षक विनोद झनक.

  ध्येयवेडा अवलिया शिक्षक विनोद झनक एका शाळेतील एका अवलिया शिक्षकाच्या 5 वीच्या वर्गातील  22 विध्यार्थी एकाच वेळी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी...