![]() |
| शालिनी संजय जाधव (इयत्ता तिसरी) |
शालिनीचा जन्म एका कातकरी आदिवासी कुटुंबात झाला.घरची परिस्थिती अतिशय बिकट,झोपडीवजा घर,आईवडिलांना मजुरीशिवाय पर्याय नाही, आई वडील दोघे ही निरक्षर.शालिनीला एक मोठी बहीण,एक भाऊ अस छोटंसं कुटुंब.शालिनी ज्या आदिवासीवाडीत राहते तिथे 25 घरांची वस्ती पण तेथे शाळा नाही,त्या आदिवासी पाड्यातील मुलांना शाळेत जायचे म्हटलं तर 2 km चालत जाऊन दुसऱ्या गावातील जि प शाळेत शिक्षण घ्यायचं. इतर मुलानंप्रमाणे शालिनी हि दररोज 2 km भावासोबत चालत चालत शाळेला जाऊ लागली व शिक्षण घेऊ लागली.तिच्या घरी सर्व व्यवस्थित सुरु असताना एक घटना घडली तिच्या वडिलांने तिच्या आईला सोडून दिले व दुसऱ्या एका महिलेसोबत लग्न केले.शालिनीच्या आईवर मोठी जबाबदारी पडली शालिनी व तिच्या भावंडाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिची आई हिंमतीने मजुरी करू लागली व तिने घरगडा चालवत चालवत मुलांचे शिक्षण हि सुरु ठेवले.वडील आईला सोडून गेले या मानसिक परिस्थितीत ही शालिनी व भावंड जिद्दीने शिकत राहिले व आईच्या कष्टाचे चीज करण्यासाठी चिकाटीने अभ्यास करू लागले.
*जानेवारी 2018 मध्ये शालिनीच्या आयुष्यात आभाळ कोसळलं* एका आजारपणात *शालिनीच्या आईचे दुःखद निधन झाले.* आगोदरच वडीलाने सोडून दिले होते व आता आईचे अकाली निधन यामुळे शालिनी व भावंड पोरके झाले. आई वडिलांचे छत्रच हरवल्यास दुसरीत असणाऱ्या मुलीची काय मानसिकस्थिती झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
अशा नाजूक परिस्थितीत शालिनीच्या आजीने (आईची आई) या तिन्ही मुलांना आधार दिला.वयोवृद्ध आजी आजोबा जवळ राहून शालिनीने जिद्दीने दुसरीची परीक्षा दिली व ती पास ही झाली.
जून 2018 मध्ये शाळा सुरु झाल्या व शालिनीची आजी शालिनीला घेऊन माझ्या जि प संतोषनगर,ता.रोहा,जि.रायगड येथे आली व आजीने शालिनीच्या जीवनाची दुःखद कहाणी सांगितली.आम्ही तिला तिसरीच्या वर्गात प्रवेश दिला व तिला जमेल तसा मानसिक आधार दिला. शालिनीला शाळेची व शिक्षणाची खूप आवड आहे,एवढ्या कमी वयात आई वडिलांचे छत्र हरवून ही ती डगमगली नाही.तिला खूप शिकण्याची जिद्द आहे, *शालिनीचे घर शाळेपासून 2 km अंतरावर आहे व ती दररोज न चुकता एकटी चालत शाळेत येते व जाते, शालिनी हुशार आहे व शाळेतील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असते.* शालिनीचे आजी आजोबा खूप थकले आहेत,जसे जमेल तसे मजुरी करून नातीचा सांभाळ करत आहेत व शालिनीही आपल्या आईचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी जिद्दीने शिक्षण घेत आहे.तिला माहित नाही की तिच्या आजी आजोबांच्या पश्चात तिचे व तिच्या शिक्षणाचे काय होईल पण आज तरी संघर्ष करत ती जगत आहे व शिक्षण घेत आहे. *आज भारतात अनेक श्रीमंतांचे मुलं पंचतारांकित शाळेत शिक्षण घेत आहेत त्याच भारत देशात शालिनी सारख्या आदिवासी भागातील अनेक मुली कठीण परिस्थितीचा सामना करत सावित्रीबाईंचा वसा चालवत आहेत.*
अशा या *शालिनी नावाच्या बालवयातील संघर्षकन्येच्या जिद्दीला सलाम......*
✍🏻..
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
प्रा.शिक्षक,जि प शाळा संतोषनगर
ता.रोहा,जि.रायगड
09923313777
![]() |
| झोपडीत आजीसोबत राहणारी शालिनी |
![]() |
| शालिनी व तिचा आधार आजी |
![]() |
| शालिनीची आदिवासीवाडी |
![]() |
| शाळेची खडतर वाट |
![]() |
| 2km चालत शाळेला जाणारी शालिनी |






Nice
उत्तर द्याहटवा