![]() |
| काजूच्या बागेत मुलांसोबत |
आज बागेत जायच्या उत्सुकतेने सर्व मुले सकाळी वेळच्या आधी सर्व आवरून शाळेत पोहचली. मग आम्ही सर्वजण निघालो काजूच्या बागेकडे.शाळेपासून 15 मिनिटाच्या अंतरावर मस्त डोंगराच्या कुशीत एक सुंदरशी हिरवीगार काजूच्या बागेत आम्ही सर्व जण पोहचलो.मग काय पायऱ्या पायऱ्यांच्या काजू बागेत मुलं जणू रान पाखरासारखं मौजमस्ती मध्ये खूप दंग होऊन गेले,कोणी झाडावर चढ तर कोणी पिकलेले काजूगर खा,तर कोणी काजूच्या बिया शोधून ठेव तर कोणी पिकलेल्या काजुंचा संग्रह करत फिरत होता.आजचा दिवस त्यांच्या मनासारखा जाणार होता.काजूच्या बागेत आलो म्हणजे त्यांना काजूची भाजी खायला मिळणार होती मग आमच्या जेवण बनवणाऱ्या ताईने झाडावरच्या ताज्या ताज्या काजू बिया काढल्या,सोलल्या मस्त काजुभाजी जेवणाचा बेत आखला. बागेत मस्त चुल पेटवली व मुख्याध्यापक कुलकर्णी मॅडम,अध्यक्षा शकुन ताईने मुलांसाठी रुचकर काजुभाजीचे जेवण बनवले.त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे आमच्या शाळेतील जगताप सरांचा आज वाढदिवस मग काय मुलांना केक,खाऊ,गिफ्ट मुलांची मज्जाच मज्जा. दुपारच्या सुमारास मुलांनी सुंदर काजुभाजीची मेजवानी चाखली व थोड्या विश्रांती नंतर पुन्हा वानरसेना धमाल मस्तीला लागली.त्या बागेत काजू सोबत,करवंदीच्या जाळी,फणसाचे झाडे,कोकमाची,आवळ्याची, आंब्याची झाडे हे सर्व पाहून व झोपाळे खेळून,झाडावर चडून हे बाळगोपाळ 4 वाजण्याच्या सुमारास थकली व आम्ही सर्वजण शाळेच्या परतीच्या वाटेला निघालो.
आजच्या सहलीत एक जाणवलं की मुलांना निसर्गाशी गट्टी करण्यास खूप आवडते.चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण मिळाल्यामुळे मुलं निश्चित सुखावले असतील.सहल संपते न संपते तीच परतीच्या वाटेने मुलांचे प्रश्न सुरु झाले , सर, पुन्हा आपण सहल कधी काढायची....?








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा