काल 10 वी चा निकाल लागला व त्या परीक्षेत माझा विद्यार्थी सचिन महेंद्र वाघमारे दिव्यांगत्वावर मात करत 61.80% गुण घेऊन उत्तीर्ण झाला पण त्याचे हे यश सहजपणे मिळाले नाही त्याचा संघर्ष लिहत आहे....
सचिनच्या जन्मापासूनच त्याचा संघर्ष सुरू झाला होता.जन्मतःच एका पायाने दिव्यांग असणाऱ्या सचिनचा प्रवास कसा होईल हे कोणालाही माहीत नव्हतं.ज्या कातकरी आदिवासी कुटुंबात सचिनचा जन्म झाला ते कुटुंब अतिशय गरिबीत राहिलेले.आई वडील दोघे मजुरी करून पोट भरणारे त्यात एक मोठी मुलगी व नंतर सचिनचा जन्म झाला पण तोही दिव्यांग.पण आई वडिलांनी त्याचा पालनपोषणात काहीच कमी केली नाही.
माझी पहिला शाळा रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी मुख्य रस्त्यापासून डोंगरात वसलेली कातकरी जमातीची लोकवस्ती तेथील सचिन हा माझा आवडता विद्यार्थी.
2013-14 साली दिव्यांग सचिनला मी इयत्ता पहिली वर्गात दाखल केले.शाळा वाडीत होती पण त्याच्या घरापासून जेमतेम200 मीटर अंतरावर होती.त्याचे आई किंव्हा वडील दररोज त्याला शाळेत सोडायला यायचे व घेऊन जायचे.जशी इयत्ता वाढत होती तशी सचिनची समजही वाढत होती.लहानपणा पासूनच सचिनला शाळा आवडायची त्याच्या बरोबरचे मुले शाळेत यायला कंटाळा करायचे पण सचिन दररोज न चुकता शाळेत यायचा. इयत्ता वाढू लागली की तो हळू हळू चालत शाळेत येऊ लागला.त्यावेळी त्याची आरोग्य तपासणी केली व त्याला कृत्रीम बूट बसवला पण तेवढा प्रयोग यशस्वी झाला नाही बुटामुळे त्याला चालायला त्रास होऊ लागायचा नंतर कुबड्या मिळाल्या पण कुबड्यावर चालायला त्याला नको वाटायचे तो पाय टेकीत चालायचा पण दोन्ही पायाची उंची कमी जास्त असल्याने त्याचा परिणाम त्याच्या मणक्यावर होऊ लागला व पाठदुखीचा त्रास होऊ लागला.तो रडायचा लागायचा ,वाडीत चौथी पर्यंत शाळा होती पण पाचवीला जायचं म्हटलं तर 2 km डोंगर उतरून पुन्हा 5 km रिक्षाने कोलाडला हायस्कुला जावं लागणार होतं अशा स्थितीत सचिनचा हा त्रास पाहून आम्हाला वाटत नव्हतं सचिन दररोज हायस्कुला जाऊ शकेल व त्याचे पुढले शिक्षण घेऊ शकेल
पण शिकण्याची जिद्द ही परिस्थिती व विकलांगतेवत मात करते हे सचिनने दाखवून दिले.
दररोज कुबड्यावर डोंगर उतरणे व चढणे असा 2 km चा प्रवास तो करू लागला पण तो प्रवास सोप्पा नव्हता.ज्यावेळी मी 2006 ते 2010 साला पर्यंत चालत शाळेला जायचो त्यावेळी तो डोंगरातील रस्ता चालताना घामेघुम व्हायचो व मध्यवर्ती एक आंब्याचे झाड होते तिथे थोडावेळ थांबून पुन्हा वर चालयचो. तो रस्ता मला माहित होता म्हणून सतत वाटायचं सचिन दररोज असा रस्ता व तेही कुबड्यावर कसा चालत जाईल? पण हार मानेल तो सचिन कसला.त्याने इच्छाशक्तीच्या बळावर 5 वी ते 10 पर्यंत दररोज तो 2 kmडोंगर उतरून चढून 10 वी चा टप्पा पार केला. त्याचा बरोबरच्या मुलांनी शाळा मधेच सोडली पण सचिनने परिस्थितीशी चार हात केले व 10 वी मध्ये 61.80 % गुण घेऊन उत्तीर्ण झाला.
इथे त्याने किती गुण घेतले महत्वाचे नाहीत तर ज्या कातकरी आदिवासी समाजात 10 वी पर्यंत शिक्षण घेणेही विविध कारणाने कठीण आहे,समाजातील मुलांचे शिक्षणाचे 10 वी पास होण्याचे प्रमाण बोटावर मोजण्या इतके आहे ,घरची परिस्थिती बिकट असूनही अपंगत्वावर मात करून सचिनने हा टप्पा गाठणे हे खूप मोठं यश आहे. सचिनच्या जन्मापासून ते 10 वी पास होईपर्यंत चा प्रवास मी समोरून पाहिल्यामुळे हे यश किती मोठे आहे शब्दात नाही सांगू शकत.काल सचिनचा निकाल जेंव्हा समजला तेंव्हा खूप आनंद झाला व सचिनचा तो खडतर प्रवास डोळ्यासमोरून गेला.ऊन पावसाची तमा न बाळगता दररोज चालत येऊन जाऊन हा टप्पा पार करणे खूप कठीण होते पण सचिनने ते करून दाखवले.येणाऱ्या काळात सचिनच्या प्रगतीचा आलेख असाच वर जावो व त्याने जे शिक्षणासाठी मेहनत घेतली त्याचे गोड फळ त्याला मिळो हीच सदिच्छा.
✍️...
श्री गजानन पुंडलिकराव जाधव

खूप छान कार्य
उत्तर द्याहटवाखरंच, विद्यार्थी कसा असावा? यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जिद्द, चिकाटी अणि स्वतःहून मेहनत करण्याची इच्छा असेल तर यश नक्कीच मिळतं. पुढील कार्याला शुभेच्छा
उत्तर द्याहटवासचिन आमच्या विद्यालयात पाचवीत दाखल झाला.तेंव्हापासून आम्ही त्याची विशेष काळजी घेतली.अपंगत्वाचे शल्य त्याला जाणवु नये हे आम्ही सतत लक्षात ठेवित असायचो.श्री वसंत थोरात सर या बाबतीत अधिक काळजी घेत.सचिनने या अवस्थेत दहावी पर्यंतचा प्रवास केला आहे.त्याचा पुढील शैक्षणिक प्रवास सहज होण्यासाठी त्याला सर्वांनी सहाय्य करूयात!
उत्तर द्याहटवाकोलाड हायस्कूल ने सचिनचा प्रवास सुखकर केला त्याबद्दल आभार
हटवासुंदर
उत्तर द्याहटवाकातकरी मुलांचं शिक्षण ही तर तारेवरची कसरत. शिक्षणाचं घरी कुठलेही वातावरण नसतांना सचिनचे हे यश इतर कातकरी मुलांसाठी खरोखर प्रेरणादायक आहे.
उत्तर द्याहटवासचिन भावाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाकातकरी मुलांचं शिक्षण ही तर तारेवरची कसरत. शिक्षणाचं घरी कुठलेही वातावरण नसतांना सचिनचे हे यश इतर कातकरी मुलांसाठी खरोखर प्रेरणादायक आहे.
उत्तर द्याहटवाउत्तर द्या
नक्कीच
उत्तर द्याहटवा