आज सकाळी 10 वाजता नेहमी प्रमाणे शाळा भरली व मुलं ही आपआपल्या अभ्यासात मग्न होते,दररोज सारखा दिनक्रम चालू होता.दुपारी 2 वाजता शाळेच्या समोर एक गाडी येऊन थांबली व त्या गाडीतून 7 ते 8 महाविद्यालयीन मुली उतरल्या व आमच्या शाळेत आल्या.आमच्या मुलांना कोण ते प्रश्नच पडला.नंतर त्यांची विचारपूस केल्यास समजलं की मुंबई येथील निर्मल निकेतन कॉलेजच्या त्या मुली होत्या व त्यांच्या उपक्रमां अंतर्गत आदिवासी मुलांमध्ये जाऊन त्या वेगवेगळे उपक्रम घेतात व मुलांना कांही तरी नवीन शिकवतात व आनंद देतात.
त्या नंतरचे दोन तास आमचे मुलं व त्या मुलींचे उपक्रमात सहभागी झाले व रमून गेले.चित्रकला स्पर्धा, थंम्ब पेंटिंग,मास्क पेंटिंग, पपेट शो, अशा वेगवेगळ्या कृती घेऊन त्यांनी आमच्या शाळेतील मुलांना खुप बोलकं केलं व आपलंसं करून जाता जाता प्रेमाचं नातं जोडून गेल्या.मुंबई सारख्या शहरी भागातील कॉलेज विद्यार्थिनींनी आदिवासी भागातील मुलांशी भेटून आपला आनंद त्यांच्या आनंदात व्यक्त करून एक आगळा वेगळा #VALENTINE_DAY साजरा केला व आमच्या शाळेतील मुलांना एक वेगळ्या प्रेमाची आठवण ठेऊन गेल्या.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा