पूर्वी भारतातुन सोन्याचा धूर निघत असे म्हटले जाई.पण वेळोवेळी होणारे परकीय आक्रमण व त्यांनी केलेली लूट यामुळे भारताची सोने की चिडीया नाहीशी होत गेली.150 वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला पण लुटारू पासून आजही मुक्त झालेला दिसत नाही. स्वातंत्र्याच्या पहाटे पासुन देशातील जनतेने पाहिलेले स्वप्न घरातील लुटारूमुळे वेळोवेळी भंग पडत गेले.ज्या जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर खंबीरपणे परिस्थितीचा सामना करीत देशाला एक उंची प्राप्त करून दिली तसेच स्वप्न भारतातील प्रत्येक युवकाने देश स्वतंत्र झाल्यास पहिले पण आज 7 दशकांत स्वप्न स्वप्नच राहिले आहे.आपल्या देशात आहे रे व नाही रे वर्गातील दरी खुप मोठी आहे.श्रीमंत श्रीमंत होत आहेत व गरीब गरीबीत मरत आहेत.कांही लोक एक वेळच्या जेवणासाठी हजारो खर्च करत आहेत व एका बाजूला जगण्याऐवढे अन्न न मिळाल्याने निष्पाप मरत आहेत.
देशातील आदिवासी ,शेतकरी ,मजूर छप्पर शोधत आहेत व उद्योगपती हजारो करोड खर्चून आलिशान टॉवर बांधत आहेत.
आज सर्वसामान्य शेतकरी,मजूर ,कर्मचारी युवक जीवापाड मेहनत करून भारत महासत्ता कसा बनेल यासाठी राबत आहे व काळ्या कोटातील सुटाबुटातील पेज थ्री वरील चोर देश लुटून परदेशात पळत आहेत.
ज्या गरिबांना हजारो कमावण्यासाठी जिंदगी घालवावी लागत आहे व एका बाजूला घामाचा थेंब ही न गाळत कांही लोक हजारो कोटींचे घोटाळे करून देश विकायला निघाले आहेत.
हे सर्व लिहण्याची इच्छा का झाली तर माझ्या शाळेच्या शेजारी एक वयोवृद्ध आजी व आजोबा एका छप्पर नसलेल्या झोपडीत राहतात त्यांच्या झोपडीत गेलो व त्यांचा जगण्याचा संघर्ष पाहिला. ज्या ठिकाणी सध्या 40℃ च्या आसपास तापमान आहे अशा परिस्तिथीत हे झोडपे कसे राहत असेल याची कल्पना कारावत नाही. हे दृश्य पाहून मन सुन्न झालं, आज त्या बिचाऱ्या आजी आजोबांना ना मल्ल्या माहीत आहे,ना निरव मोदी, ना चोक्षी ,ना हजारो कोटींचे घोटाळे, ना अच्छे दिन. यांना फक्त दीनची जाणीव आहे.एक मात्र जाणवलं ते जगण्याचा आंनद ते मनसोक्त घेत आहेत,दररोज उगवलेला प्रत्येक दिन अच्छे दिन म्हणून ते जगत आहेत.40℃ तापमानात जगणाऱ्या या दीनांची जाणीव 18℃ मध्ये राहणार्यांना कधी समजेल. म्हणून वाटतं खरच भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे ???
✍🏻....
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
प्रा.शिक्षक,जि प शाळा संतोषनगर,ता.रोहा,जि.रायगड.
📱-09923313777
📧- gajanan.jadhav1984@gmail.com




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा