*एक अटल पर्व...*
(1924-2018)
मेरे प्रभू!
मुझे इतनी ऊंचाई
कभी मत देना
गैरों को गले न लगा सकूं
इतनी रुखाई कभी मत देना
माझे सर्वात आवडते पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने काल निधन झाले. महाविद्यालयीन जीवनातच एखाद्या नेत्यांचा प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यात पडत असतो कारण ते वयच विचारप्रवण बनण्याचे असते 1999 ते 2004 या माझ्या दहावी ते महाविद्यालयीत जीवनात अटलजींचे विचार खूप प्रभावित करून गेले.
अटलजींचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर येथे झाला. वयाच्या 15व्या वर्षी 1939 साली अटलजीने रा.स्व.संघात प्रवेश केला.पुढे स्वतंत्र भारतात 1951 साली जनसंघाची स्थापना झाली व अटलजीने सरचिटणीस म्हणून काम केले.1957साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटलजीला मथुरा लोकसभा मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला पण बलरामपूर मधून ते निवडून आले.1957 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर जनसंघाची जबाबदारी अटलजी वर आली व ते सर्वात तरुण अध्यक्ष बनले.1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली व त्यात बड्या बड्या नेत्यांना जेलमध्ये घातले त्यात अटलजीनाही तुरुंगवास घडला.पुढे इंदिरा गांधींच्या विरोधात जनता पक्षात जनसंघाचे विलीनीकरण झाले व 1977 च्या निवडणुकीत मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले व त्या सरकार मध्ये अटलजींना परराष्ट्र मंत्रालयाचे काम करण्याची संधी मिळाली.पुढे चालून 1980 मध्ये अटलजीने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली व ते पहिले अध्यक्ष बनले.1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली व नंतरच्या काळात झालेल्या निवडणुकीत भाजप चे फक्त 2 खासदार निवडून आले त्या नंतर अटलजीने व अडवाणीने आपल्या पक्षाचा विस्तार केला व 1996 च्या निवडणुकीत अटलजींचे सरकार सत्तेत आले पण ते फक्त 13 दिवस टिकले यांचे सरकार 1 मताने पडले.पण अटलजीने जिद्द सोडली नाही नंतर झालेल्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षासह सत्तेत आले व19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान राहिले. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या भारत देश प्रगतीपथावर कसा येईल यासाठी प्रयत्न केले. परराष्ट्र धोरणाला जास्त प्राधान्य दिले.पाकिस्तान सोबत कधी रोखठोक तर कधी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून काश्मीर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.कारगिल युद्ध असो या दिल्ली लाहोर बससेवा असो की धाडसी परमाणू अणुचाचणी असो वेळोवेळी जगाला अटलजींच्या नेतृत्वाखाली एक चुणूक दिसली.दिल्ली-मुंबई-चन्नई-कोलकता हा त्यांचा रस्तेबांधणीतील महत्वपूर्ण सुवर्ण चोकोन प्रकल्प खूपच देशाच्या विकासाला चालना देणारा ठरला.2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अटलजींच्या सरकारला पराभवाचा सामना करावा लागला व त्यानंतर अटलजी सकल राजकारणा पासून दूर गेले व पुढे अनेक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागले.शेवटी 16 ऑगस्ट 2018 रोजी अटलजींची प्राणज्योत मावळली.अशा या प्रभावी माजी पंतप्रधानाला भावपुर्ण श्रद्धांजली.
💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
✍🏻...
*श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा