मित्रांनो गेल्या दोन महिन्यांपासून आपण सर्व dcps धारक 2 ऑक्टोबर 2018 च्या पेन्शन दिंढीची वाट पाहात होतो.आपल्या हक्कच्या लढ्यासाठी आपण महात्मा गांधीजींच्या विचाराने चालणार होतो.स्वराज्याचे संस्थापक छ.शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यापासून आपले शूर मावळे या दिंडीचा एल्गार करणार होते.त्यासाठी दररोज सकाळ- संध्याकाळ,ऊन-पावसाची तमा न बाळगता हे मावळे धावण्याचा सराव करत होते. सर्व महाराष्ट्रात एक शांततामय आंदोलनाची आखणी सुरु होती.आपली सर्व राज्य कार्यकारणी गेले अनेक दिवस या सनदशीर मार्गाने होणाऱ्या पेन्शन दिंडीच्या परवाणग्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन मुंबई येथे तळ ठोकून बसली होती.पण आपण आपल्या हक्कासाठी करत असलेले आंदोलन दडपण्यासाठी आपल्या परवाणग्या नाकारण्यात आल्या. *छ.शिवरायांच्या पावण भूमीतून दौड घेण्यासाठी बंदी आणली,कलम 144 लावले,ठाणे ते मंत्रालय पायी दिंडीची परवानगी नाकारली.* पण किती ही हे आंदोलन दाबण्याचे ठरवले तर ते सरकारला आता शक्य होणार नाही.आज महाराष्ट्रातील कान्याकोपर्यातून dcps धारक मुंबईकडे वाटचाल करायला निघाला आहे. कोणी किती ही प्रयत्न केले तर हे आंदोलन आता थांबणार नाही हे आता सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
या सर्व घडामोडीवर *कवी हरिवंशराय बच्चन यांची कोशिश कविता* आठवली ही कविता आपल्या सर्वांना पेन्शन दिंडी साठी आत्मविश्वास वाढवणारी ठरेल
*कोशिश....*
लहरों से डर कर नौका पार नहीं होती ।
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ॥
नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है ।
चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है ॥
मन का साहस रगों में हिम्मत भरता है ।
चढ़ कर गिरना, गिर कर चढ़ना न अखरता है ॥
मेहनत उसकी बेकार हर बार नहीं होती ।
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ॥
डुबकियां सिन्धु में गोताखोर लगाता है ।
जा जा कर खाली हाथ लौट कर आता है ॥
मिलते न सहज ही मोती गहरे पानी में ।
बढ़ता दूना विश्वास इसी हैरानी में ॥
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती ।
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ॥
असफलता एक चुनौती है, स्वीकार करो ।
क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो ॥
जब तक न सफल हो, नींद – चैन को त्यागो तुम ।
संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम ॥
कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती ।
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ॥
मित्रांनो कोणी किती ही प्रयत्न केला हे आंदोलन दाबण्याचा तरी हे आता शक्य होणार नाही.निसर्गाचा नियमच आहे , *जेवढं खाली दाबाला त्यापेक्षा कैकपटीने उफाळून येत.* तसंच या dcps धारकांच आहे,हे तरुण रक्त आहे आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत यांना जर कोणी दडपण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक हिंमतीने लढा देतील. *तर मग चला आता 2 ऑक्टोबर 2018 ला आझाद मैदान मुंबई...*
आता एकच करायचं *रडायचं नाही आता लढायचं.....*
*_एकच मिशन जुनी पेन्शन_*
*✍🏻....श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*DCPS धारक,रोहा,रायगड*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा