![]() |
| जपानी तरुणांच्या मनातील भारत समजून घेताना... |
शुक्रवारी म्हणजे 22 फेब्रुवारीला मी एका कार्यक्रमासाठी मुंबई वरून रेल्वेने औरंगाबादसाठी जनशताब्दी एक्सप्रेसने निघालो होतो.तेंव्हा माझ्या शेजारी एक 24 ते 25 वर्षाचा परदेशी युवकाचे रिजर्वेशन होते.त्याची देहबोली पाहून मी ओळखलो की तो पूर्वत्तर देशातील असावा.मग आमची हाय बाय ने सुरवात झाली. तो कोणाशी बोलत नव्हता व माझी त्याला बोलायची इच्छा असून भाषेमुळे काय बोलावं सुचत नव्हतं😇. मग अर्धा तासांनी आपल्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत संवाद सुरु झाला. पण संवाद करत असताना मला जाणवलं की त्याची पण इंग्रजी आपल्या सारखीच😝. मग सुरु झाल्या गप्पा, त्याला मी नाव व देश विचारलं, तो बोलला *टोगो आहारा* व देश *जपान*. जपान देशातील नारा शहरातला हा 24 वर्षीय तरुण एकटाच 20 दिवसाच्या भारत पर्यटन दौऱ्यावर आला होता. त्याच मला खूप कौतुक वाटत होत कारण आपण इतर राज्यात जायचं म्हटलं तर घाबरतो पण टोगो एकटाच भारत दौऱ्यावर आला होता. मला वाटलं हा परदेशात फिरायला आला म्हणजे मोठ्या घरातील असावा किंव्हा आईवडील चांगल्या नोकरीत असतील व हा त्यांच्या पैशावर आलाय पर्यटनाला.पण पुढील प्रवासात त्याच्याशी जी चर्चा झाली ते ऐकून मी त्याच्यावर खूप प्रभावित झालो व ती चर्चा आपल्याला सांगावी असे वाटते.
टोगो हा जपान मधील ritsumeikan विद्यापीठाचा पदवीचा विध्यार्थी. तो 2014 साली मित्रांसोबत 5 दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर आला होता व त्यावेळी त्याला मनासारखं भारत फिरता आलं नसल्याने त्याने ठरवलं होतं की तो पुन्हा भारतात येईल व त्या प्रमाणे तो या वेळी 20 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आला आहे. तो 20 तारखेला जपान मधून भारतात आला व दोन दिवस मुंबई फिरून तो अजिंठा,औरंगाबाद पाहायला जात होता.मी त्याला विचारलं तुझे आई वडील काय करतात तर तो म्हणाला, आई शिक्षिका व वडील कंपनीमध्ये जॉब करतात.मला वाटलं तो आईवडिलांच्या पैशावर फिरायला आला असेल म्हणून मी त्याला विचारलं की तुला पैसे आई वडिलांनी दिले का? तो खूप आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाला नाही नाही मी स्वतः एका हॉटेलमध्ये 4 महिने पार्ट टाईम जॉब करून पैसे कमावले व पुरेसे पैसे जमा झाले की भारत भेटीवर आलो.त्याच्या बोलण्यात खूप आत्मविश्वास वाटत होता व जपानने कशी अल्पावधीत प्रगती केली हे नकळत जाणवत होते. तो म्हणाला मी 4 वर्षांपूर्वी ठरवलं होतं की पुन्हा भारत फिरायला येईल व तेही स्वतःच्या पैशाने.मग त्याने कॉलेज करत करत पार्ट टाईम जॉब केला. त्याला विचारलं की तुझं भारत दौऱ्याच बजेट किती आहे तर तो म्हणाला 400000 येन म्हणजे भारतीय 250000 च्या आसपास रुपये. त्याने हॉटेलमध्ये काम करत प्रति महिना 100000 येन कमावले व 4 महिने काम करून जमलेल्या रकमेत विमान तिकीट व 20 दिवसाचे भारत दौऱ्याचे नियोजन केले.हे ऐकून मी थक्क झालो कारण 24-25 वयातील जपानी तरुनांचे विचार व त्या देशाची प्रगतीसाठी किती उपयोगी आहेत जे जाणवले.
त्याला अनेक प्रश्नावर मी छेडले की तू 20 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आला आहेस पण तुझ्या प्लॅनमध्ये मुंबई-औरंगाबाद-जयपूर-आग्रा-वाराणसी मार्गे नेपाळ या दौऱ्यात तुला काश्मीर का घ्यावस वाटलं नाही? तर तो हसला व म्हणाला, मी भारतात जाणार असे माझ्या आई वडिलांना सांगितले तेंव्हा त्यांनी मला बजावले की तू भारतात कुठे ही जा पण काश्मीर मध्ये जाऊ नको.मी त्याला विचारले का? तर तो म्हणाला दहशतवादी हल्ले व पाकिस्तानची सीमा असल्याने तिथे जाण्याची परवानगी घरच्यांनी दिली नाही. पण तो म्हणाला की कश्मीर सोडून मला भारतात एकटे फिरायला अजिबात भीती वाटत नाही.यावरू एक जाणवलं की काश्मीर प्रश्नी सर्वसामान्य परदेशी नागरिक किती सतर्क आहेत ते. टोगो खास करून वाराणसी व गंगा स्नानासाठी या मुख्य आकर्षणाने भारतात आलेला समजल. त्याला मी म्हटलं तू भारताबद्दल आणखी काय जाणतो तर तो बोलला गौतम बुद्धांची भूमी व वाराणसी ,गंगा नदी व महात्मा गांधी . त्याला मी कांही भारतीय नेत्यांचे व खेळाडूंचे व अभिनेत्यांचे फोटो दाखवले तर त्यांनी फक्त अमीर खानला व मा.नरेंद्र मोदींना ओळखले ,कारण अमिरचा 3 इडीयट हा चित्रपट त्याने जपानी भाषेत पाहिला होता व मा.मोदी साहेबांना tv मध्ये पाहिले होते. टोगो सोबतच्या 6 तासाच्या प्रवासात खूप मजा आली.त्याला मी विचारलं की भारतीय लोक तुला कसे वाटतात तर तो म्हणाला खूप चांगले आहेत पण कांही चिटिंग करतात.(प्रामुख्याने पर्यटन स्थळी परदेशी नागरिकांना लूट पद्धतीमुळे त्याचा विचार असा झाला होता). टोगोला मी एक घरून डब्ब्यात दिलेला लाडू खायला दिला तो त्याने खाल्ला व लगेच त्याची गाईड बुक काढून मला मराठीत म्हणाला' स्वादिष्ट'. मी त्याच्याकडे बघतच राहिलो व त्याचे गाईडबुक पहिले पण कांही समजेना कारण ते सर्व जपानी भाषेत होते🤔.पण त्याला मी विचारलं की तू स्वादिष्ट कसं कसं बोलला तर तो म्हणाला,जपान मधून परदेशात जे पर्यटक पर्यटनाला जाणार आहेत त्या देशातील महत्वाचे ठिकाणे, तेथील हॉटेल्स, आहाराचे पदार्थ,तेथील भाषा याचे सर्व डिटेल्स त्या गाईडबूक मध्ये असते.मग त्याने महाराष्ट्रातील विभागात जाऊन कॉम्प्लिमेंट शोधून मला ऐकवली. ते पुस्तक मी सहज हातात घेतले तर सुरवातीच्या मुखपृष्ठावर वाराणसी मधील गंगास्नानाचे दृश्य होते.त्यात आत प्रत्येक ठिकाणची सविस्तर माहिती,त्या ठिकाणच्या हॉटेलचे क्रमांक, खाद्य संस्कृती,चलन,शीतपेय,वाईनरी पेय,पोलीस,अंबुलन्स,फायर नंबर याचा समावेश होता.हे सर्व इंग्रजी भाषेत नसून जपानी भाषेत होते यावरून जाणवले की परदेशी राष्ट्रे आपल्या भाषेबद्दल किती जागृत असतात.मी सहज त्यातील भारताचा नकाशा पाहिला त्या नकाशात जपानी व इंग्रजी भाषेत पर्यटन स्थळांचे नावे होते त्यात मी महाराष्ट्रातील नकाशा पाहिला तर फक्त 5 नावे दिसली त्यात मुंबई,पुणे,औरंगाबाद,वेरूळ, अजिंठा हे मला समजल नाही की महाराष्ट्रातील किल्ले,समुद्र किनारे एवढे सुंदर आहेत पण त्यात यांचा समावेश नव्हता उलट उत्तर प्रदेश मधील बऱ्याच छोट्या मोठ्या शहरांचा उल्हेख जाणवला. टोगोचा सर्व प्रवास दौरा या पुस्तकाच्या आधारे होता. मी म्हटलं त्याला येथील समुद्र किनारे,किल्ले खूप छान आहेत ते बघ पण तो प्लन बदल करायला तयार नव्हता पण त्याने मला सांगितलं पुढल्या भारत दौऱ्यावर येईल तेव्हा तुझ्याकडे नक्की येईल व सर्व पाहिल. गप्पांच्या नादात औरंगाबाद जवळ येत होते, मनमाडच्या आसपास आम्ही चहा घेतला व पुन्हा गप्पा सुरु.त्याने मोबाईल बाहेर काढला व मेलवर औरंगाबाद हॉटेल्सचे डिटेल पाहत होता मी त्याला विचारलं तू whats app वापरतो का😝? तो म्हटला only messenger and facebook मग आम्ही एकदाचे फेसबुक मित्र झालो. औरंगाबादला 8.30 ला पोहचलो व 6 तासाच्या प्रवास ओळखीत एक आंतरराष्ट्रीय मित्र मिळाला हे समजलंच नाही. टोगोला त्याच्या इच्छित ठिकाणी पोहचण्याचा मार्ग दाखवला व मी तेथून माझ्या मार्गी लागलो.
रविवारी सकाळी messenger मी त्याला massage टाकला की तू रात्री व्यवस्थित पोहचला का तर तो म्हटला ,पोहचलो व तुला भेटून खूप बरं वाटलं पण रात्री माझं पॉकेट रेल्वेस्टेशन वर कोणीतरी मारलं व 2000रु कॅश व क्रेडिट कार्ड चोरीला गेलं पण मी क्रेडिट कार्ड ब्लॉक केलं अस म्हणून जाऊ दे म्हटला. हे त्याचा massage पाहून एक भारतीय म्हणून मला खूप खजील वाटलं. एखादा परदेशी पर्यटक येतो व त्याला अशा घटनांना सामोरे जावे लागते तेंव्हा आपल्या देशाचे नाव कांही भुरट्या लोकांमुळे नाहक खराब होत असते.एका बाजूला अतिथी देवो भव म्हणायचं व त्याच अतिथींच पॉकेट मारायचं हे कांही प्रवृत्तीच्या लोकांमुळे देशाची प्रतिमा नकळत खराब होत असते. आज पुन्हा एकदा टोगोचा messenger वर संपर्क झाला तर तो औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा पाहून खूप आनंदी झाला होता व पुढल्या प्रवासासाठी तो अहमदाबाद करून आग्रा मार्गे वाराणसी व नंतर नेपाळ देशात जाणार असल्याचे समजले. मी त्याला कटू अनुभवातून शिकण्याचा सल्ला दिला व पुढील प्रवासाला शुभेच्छा देऊन पुढल्या दौऱ्यात आल्यास कोकण व रायगड किल्ला पाहण्यासाठी निमंत्रण दिले......
✍🏻....
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
09923313777
![]() |
| जपानी गाईडबूकवर वाराणसीचे चित्र |
![]() |
| रेल्वे प्रवासातील गप्पा |
![]() |
| परिपूर्ण गाईडबूक |
![]() |
| टोगो व मी |
![]() |
| गाईडबुक मध्ये सखोल माहिती |
![]() |
| भारताचा पर्यटन नकाशा |







छान
उत्तर द्याहटवाThanks sir
हटवाछान...💐💐
हटवानाव तुमचे गजानन
तुमचे सुंदर असे लेखन
शब्दरचनेचे छान असे नियोजन
नावाप्रमाणेच तुम्ही महान..
केली तुम्ही टोटो सोबत दोस्ती
घडून आणली शब्दाची धमाल आणि मस्ती.
झाला तुम्ही टोटोचा आज मित्र
त्याने मनातल्या मनात वाचले तुमचे चरित्र..
आज वाढला तुमचा फेसबुक फ्रेंड
तुम्ही त्याच्यासाठी भारतातील ग्रँड
दोस्तांमध्ये तुमची वाढली क्रेझ
होईल आता परदेशात तुमची दोस्ती इनक्रीज
*संधीचे करून तुम्ही सोने*
पेरले सगळीकडे गुणवत्तेचे दाणे...
मिळो तुमच्या कला - गुणांना वाव.
होईल तुमचे सगळीकडे नाव.
🙏🙏
आपलाच मित्र
श्री. एस. डी. बोरुडे
खूप छान कविता सर,आपण खूप सन्मान दिलात आपल्या कवितेतून आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो
हटवाखूप छान सर.
उत्तर द्याहटवाThank you
हटवाVery nice blog uncle......
उत्तर द्याहटवाNice sir. 👍👍👍
उत्तर द्याहटवाThanks
हटवाVery nice Gajanan sir !! Your friendly , talkative & co-opetative nature makes good impact on the person who comes in contact with you !! That's why u got an international friend like TOGO !!You are the best indian that Togo interacted with !!He will remember our India as great country only because of you !!
उत्तर द्याहटवाThank you so much this comments
हटवाजाधव सर खूप छान, लिहण्याचा छंद असाच राहू द्या👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपल्याला वाचायला आवडतंय हेच महत्वाचं
हटवाजाधव सर खूप छान
उत्तर द्याहटवाछान लिखाण मित्रा
उत्तर द्याहटवाThank you
हटवामस्त अनुभव share केल्याबद्दल धन्यवाद, आणि हो टोगो रायगडला आला की कळवा आम्ही येऊ भेटायला 👍👍👌👌
उत्तर द्याहटवाThanks Sir, nkkin
हटवाBest mama
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाGood job jadhav sir..
हटवामस्त काका आपण प्रवासातील अनुभवाची शब्धरचनेत मस्त सांगड घातलीय
उत्तर द्याहटवाNice...Mama��
उत्तर द्याहटवाThanks pankaj
हटवाखुप छान सरजी.आपल्या या लेखनातुन भरपुर सखोल अशी माहिती वाचकास मिळत आहे.आपले खुप खुप अभिनंदन व आपल्या लेखनकार्यास शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर,माझं लेखन आपणास आवडत आहे ही खूप मोठे प्रोहत्साहन आहे
हटवाखूपच छान गजू भैया तुम्ही आपली संस्कृती आणि विकृती यांची सखोल माहिती दिली आणि i wish तुम्हाला भेटुन त्याला भारताबद्दल आदर निर्माण झाला😊🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखुप छान सरजी.
उत्तर द्याहटवाKhup chhan sirji great bhet.
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवाटोगो व तुमची मैत्री छानच!!!
उत्तर द्याहटवापण आपल्या 24/25 वर्षाचा तरुणाला आता लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेत. आपल्या तरुणानि टोगोचा आदर्श घ्यायला हवा....
great bhet
नक्कीच,
हटवाVery nice mitra.
उत्तर द्याहटवाबहोत खूब गजू यही अदा है तेरी निराली जो औरोसे तुझे जुदा बनाती है। किसी पराये को पल मे अपना बनाए ये तुझसे सीखे। so keep it up and don't leave your nature till last moment. Best luck
उत्तर द्याहटवाThank you so much sameer
हटवाNice ...
उत्तर द्याहटवाGreat Gajju... funtastics..lovely..experience
उत्तर द्याहटवाNice dada
उत्तर द्याहटवाKhup chan anubhav👌👌
उत्तर द्याहटवाThank you
हटवाNice sharing. Jadhav sir you should try writeups.your approach towards to look things is different. We see you as a writer in future. Wishes you the best .thanks .
उत्तर द्याहटवाThank you so much sir
हटवा