![]() |
| असा झालो मी गुरुजी-श्री गजानन जाधव |
तसं माझं बालपण आनंदी गेलं घरात सर्वात लहान व शेंडेफळ म्हणून माझा लाड खूप व्हायचा.वडील पोलीस खात्यात असल्याने ते नोकरी निमीत्त लातूर, उदगीर,चाकूर,निलंगा येथे असायचे आठवड्यातून एक ते दोन दिवस ते गावी असायचे त्यामुळे सर्व गरजा आई पुरवायची.जरी वडील पोलीस खात्यात असले तरी त्यांनी कुटुंब गावीच ठेवलं होतं कारण 1971 ते 1982 आमचं कुटंब जालना येथे होत त्यावेळी वडील राज्य राखीव दलात होते व 1982 साली लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली व वडिलांनी आपली बदली स्वजिल्ह्यात करून घेतली मग आमचं कुटुंब गावी स्थायिक झाले. मोठ्या दोघी बहिणींचे शिक्षण गावातच पूर्ण झाले गावात 10 वी पर्यन्त शाळा होती.
मी पण लहानाचा मोठा होत गेलो तसा घरा जवळील बालवाडीत माझा प्रवेश झाला मग काय घर ते बालवाडी 100 मीटर अंतर मस्त मजेत तेथे 2,3 वर्ष काढले.गावात जिल्हा परिषदची चौथी पर्यंतची शाळा होती.बालवाडीचे शिक्षण झाल्यास मला 1990 साली गावातील जि प शाळेत पहिलीत प्रवेश देण्यात आला पण घरापासून शाळा लांब असल्याने मी शाळेला बुट्टी मारयोचो ,घरचे पण कंटाळले होते की हा शाळेत नाही जात म्हणून मग एके दिवशी माझे मोठे बंधू श्री अशोक जाधव (अण्णा)त्यावेळी औरंगाबाद येथे शिक्षण घेत होते व ते गावी सुट्टीला आले होते तेव्हा घरच्यांनी माझे प्रताप त्यांना सांगितले मग काय त्यांनी मला अशी अद्दल घडवली की माझे हातपाय बांधून गावातून माझी धिंड काढत मला शाळेत दाखल केले.त्यानंतर माराच्या भीतीने मी कधी शाळा चुकवली नाही व इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण आनंदात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले.
प्राथमिक शिक्षणाचा टप्पा अगदी आनंदात पार पडला होता व पुढील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय पण गावातच होती, बापूजी विद्यालय हे 1967 पासून गावात स्थापन झाले होते व पंचक्रोशीतील विध्यार्थ्यांना तेथे शिक्षणाची चांगली सोय होती.त्याप्रमाणे मी पण पाचवीला बापूजी विद्यालयात प्रवेश घेतला व सुरु झाला वरच्या शाळेतील प्रवास.वरची शाळा म्हणजे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेला खालची शाळा व माध्यमिक शाळेला वरची शाळा म्हटलं जायचं म्हणून वरच्या शाळेतील प्रवास. पाचवी ते दहावी पर्यन्त दोन तुकड्या होत्या एका तुकडीत गावातील सर्व मुलं व दुसऱ्या तुकडीत शेजारच्या 4,5 गावातून शिकायला येणारे मुलं त्यामुळे आमची तुकडी अ होती.1995 ते 2000 हा काळ बापूजी विद्यालयात गेला तेथे अनेक दर्जेदार शिक्षकांचा सहवास लाभला,शिस्त,खेळ,चित्रकला अशा अनेक गोष्टी तेथे शिकायला मिळाल्या शालेय जीवनात जास्त करून कबड्डी खेळात सहभाग घेतला तालुका,जिल्हा,विभागीय पातळी पर्यन्त कबड्डी खेळण्याची संधी मिळाली व जीवनाला एक दिशा देणारे शालेय जीवन लाभले. माझी आई त्यावेळी सातवी शिकलेली आमच्या घरात जुन्या पिढीत तीच शिकलेली त्यामुळे तीच माझा अभ्यास घ्यायची तसा मी मधल्या फळीतील म्हणजे जास्त हुशार ही नाही आणि जास्त ढ ही नाही त्यामुळे अशा वाटचालीत 2000 साली दहावीत 62% मार्क घेऊन उत्तीर्ण झालो व गावपातळीवरील शिक्षणाला येथे पूर्णविराम मिळाला.
दहावी पर्यंतचे शिक्षण म्हणजे समज येण्यापूर्वीचे शिक्षण तो पर्यन्त आपल्याला काय व्हायचंय आपलं ध्येय काय ते ठरवलेलं नसत पण जेव्हा दहावीचा निकाल लागतो व तेंव्हा अचानक पुढे काय करावं हा प्रश्न आ वासून असतो.कोणी म्हणत सायन्स घ्या कोणी म्हणत आर्ट घ्या,कोणी म्हणत कॉमर्स घ्या पण आपल्याल कोणत्या क्षेत्रात जावं हेच कळत नसत त्याप्रमाणे माझी ही तीच अवस्था झालेली.त्यावेळी आमचं अहमदपूरच राज्यात नावाजलेल कॉलेज म्हणजे महात्मा गांधी कॉलेज प्रत्येकाला तेथे प्रवेश घेण्याची इच्छा असायची त्याप्रमाणे माझी ही इच्छा होती पण कोणती शाखा घ्यायची हे ठरलं नव्हतं.आईला वाटायचं सायन्स घेऊन मेडिकल किंव्हा इंजिनियर व्हावं पण सायन्स म्हटलं की इंग्रजी गणिताची भीती मला खूप होती त्यात मला 62% मार्क त्यावेळी जर महात्मा गांधी कॉलेजला सायन्स प्रवेश हवा असेल तर 80% च्या वर मार्क लागायचे त्यामुळे माझा सुंठी वाचुन खोकला गेला असं झालं.मला आर्ट करायचं होत व त्याप्रमाणे खेळाच्या कोठ्यातून मला आर्टला ऍडमिशन भेटलं व एक फायनल झालं की आपण आता डॉक्टर इनिजनियर होऊ शकणार नाहीत,माझी आई नाराज झाली कारण तिला नेहमी वाटायचं मी डॉक्टर किंव्हा इंजिनियर व्हावं. पण तिने सांगितलं आर्ट्स मध्ये चांगला अभ्यास करून कांही तरी हो.मराठवड्यात व आमच्या भागात एकच ध्येय आर्टस् घेतलं की बारावी नंतर एकच ध्येय डीएड प्रवेश, लवकर शिक्षण व लवकर नोकरी हेच ध्येय.पण मला कधीही वाटलं नाही की आपण पण डीएड करावं व त्या प्रमाणे अभ्यास करावा. जसे जमेल त्या पद्धतीने बारावीचा अभ्यास केला व बारावीला 71% गुण मिळाले. त्यावेळी इतर मित्र ded चा अर्ज करायचे त्या प्रमाणे मित्रांसोबत फार्म भरला पण खुल्या गटात 73% पर्यन्त मेरिट लागले व इथेही माझा नंबर डीएड ला लागला नाही.मग जास्त विचार करत नाही बसलो मग ठरवलं आता BA करायचं व शिकत राहायचं त्या प्रमाणे महात्मा गांधी कॉलेजला ऍडमिशन घेतलो व आपल्या पद्धतीने शिक्षण सुरु ठेवलं.2003 साली प्रथमवर्ष पास झालो ,2004 ला द्वितीय वर्षात प्रवेश घेतला व अचानक द्वितीय वर्षाच्या मध्यात असताना शासनाने नवीन नियम काढला की डीएड साठी कांही सीट संस्था चालकाच्या कोट्यातून भरल्या जाव्यात त्याप्रमाणे मग प्रत्येकाची धावपळ ded कडे जाण्याची सुरु झाली मग माझ्या घरच्यांची पण इच्छा होती की ह्याने डीएड कराव पण मला मार्क कमी असल्याने पहिल्या वेळी संधी हुकली होती पण या नवीन नियमामुळे संधी फिरून आली होती.माझे मोठे बंधू प्रा.श्री अशोकराव जाधव यांनी मला समजवल व त्यांनी मॅनेजमेंट कोट्यातून शिरूर ताज येथे मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयात माझे ऍडमिशन केले व आता पक्क ठरलं की मी गुरुजी होणार म्हणून.
2003 च्या डिसेंम्बर महिन्यात शिरूर ताजबंद येथे ऍडमिशन घेतले व सुरु झाली गुरुजी होण्याची ट्रेनिंग मग काय सेतुपाठ,पाठ,प्रक्टिकल असे करत करत दोन वर्षे कधी संपले कळले नाही.ज्यावेळी डीएड ला ऍडमिशन खूप कठीण प्रसंगातून व स्पर्धेतून झाले होते व आता खूप दडपण होते की आता जर अभ्यास नाही केला व मार्क कमी मिळाले तर शासकीय सेवेत काम करता येणार नाही व घरच्यांनी ,बंधूनी ज्या स्थितीत डीएड ला नंबर लावला त्यांना काय उत्तर द्यायचे या धास्तीने अभ्यास केला व 2005 ला परीक्षा देऊन मार्च 2006 साली 69% मार्क घेऊन डीएड उत्तीर्ण झालो.पण प्रश्न होता पुढे काय करायचे कारण एवढ्या मार्कला नोकरी लागते की नाही याचा पण भरोसा नव्हता.नशीब त्या वर्षी राज्यात जवळपास 12000 ते 15000 हजार शिक्षकांची भरती निघाली व त्यामध्ये लगेच अर्ज केला पण कुठला कॉल येईल का नाही याची पण खात्री नव्हती.माझे जे मित्र जास्त गुणवाले होते त्या एका एकाला दहा दहा जिल्ह्याचे कॉल येऊ लागले तसा माझा जीव खाली वरी होऊ लागला व वाटू लागलं एक तरी आपल्याला कॉल आला पाहिजे व गम्मत काय एक दिवस मला पण कॉल आला तो होता जळगाव जिल्हा परिषदेचा त्या नंतर दोन दिवसांनी रायगड जिल्हा परिषदेचे कॉल लेटर आले. प्रश्न असा होता की दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे 3 मे 2006 ला मुलाखत मग एकाच ठिकाणी जायचं असा नियम होता.जळगाव व रायगड मध्ये निवड करायला मी जास्त वेळ घेतला नाही कारण एक तर रायगड स्वराज्याची राजधानी त्यावर कोकण म्हणजे निसर्ग सौन्दर्याची खाण मग अशा जिल्ह्यात जर नोकरीची संधी मिळाली तर आपलं किती भाग्य ह्या हेतूने पटकन रायगड ची निवड केली व 3 मे च्या मुलाखतीला जायचं ठरवलं.2 तारखेला अलिबागला पोहचलो जिल्हा परिषदेत चौकशी केली तर तेथे समजल 220 जागा रिक्त आहेत व माझा मुलाखत नंबर होता 719.आता म्हटलं आपल्याला कांही नोकरी भेटत नाही तेंव्हा मुलाखत द्यायची न आपला घरचा रस्ता पकडायचा.ठरल्या प्रमाणे 3 मे ला मुलाखत दिली व त्यानंतर अलिबाग बीच फिरून आलो व आता गावी निघावं या तयारीत असताना जिल्हा परिषद मधून निरोप आला की आज ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांची सर्वांची निवड झाली आहे व रात्री उशिरा नियुक्ती पत्र मिळून जातील हे जेंव्हा कानावर शब्द पडले तेंव्हा आनंदाला सीमा राहिली नाही लगेच गावी आईला, भावाला,मित्रांना फोन करून सांगितलं मला रायगडला नोकरी भेटली. रायगड मध्ये 216 जागा व आपला 919 नंबर मग कशी नोकरी मिळेल याच विचारात होतो पण झालं असं की 3 मे ला राज्यात एकाच दिवशी मुलाखती असल्याने प्रत्येक जण एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकत होता त्यामुळे रायगडला खूप कमी उमेदवार आल्याने मला नोकरी भेटली होती. त्या दिवशी रात्री 12 च्या पुढे आम्हला सर्वांना नियुक्ती आदेश देण्यात आले त्यात माझा नंबर आला ,माझा हातात नोकरीची पहिली ऑर्डर हातात पडली. ती ऑर्डर पाहिली त्यात तालुका व शाळा लिहली होती रोहा तालुक्यातील पाले खु आदिवासीवाडी ही शाळा मला भेटली होती.रात्रीचे 1 वाजले होते सोबत असलेले बरेच मित्र आपल्याला भेटलेल्या तालुक्यात उद्या जायचं शाळा पाहायची अशी आखणी करत होते पण मी मात्र आता नोकरी भेटली पहिलं आपलं घर गाठायचं व जो तालुका व शाळा भेटली त्या ठिकाणी 12 जून ला जायचं अस ठरवलं व मनमुराद आनंदात अलिबाग वरून लातुर अहमदपूर रोकडा सावरगाव असा परतीचा प्रवास सुरु केला होता व सतत डोक्यात एकच विचार होता की ,'मी गुरुजी झालो, मी गुरुजी झालो'.......

खूप छान सर
उत्तर द्याहटवामनात बाळगलेल्या एका जिद्दीचा प्रवास असं ही म्हणता येईल या लेखाला
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर मांडणी .
उत्तर द्याहटवासर्वांचे मनपूर्वक आभार
उत्तर द्याहटवाप्रिय गजानन खुप छान लिखाण केलं.
उत्तर द्याहटवासध्याचे परिस्थितीत ज्या प्रमाणे वेळेचा सदुपयोग करून लिखाणाचा छंद जोपासत आहेत तो खरच स्तुत्य आहे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.आजच्या नोकरीच्या ताणतणावयामध्ये तसेच आपल्यासह जगावर ओढवलेल्या आस्मानी संकटात आपले लेखन आम्हाला आमचे बालपणात घेऊन गेले व आमच्या भूतकाळातील सुखद आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल आपले आभार.
आशा करतो आपणाकडून असेच लेखन होत राहील आणि एक दिवस आम्हाला तुमचे एखादे चांगले पुस्तक वाचण्याची संधी मिळेल.
अनेक शुभेच्छांसह
दत्ता लोंढे
प्रिय गजानन खुप छान लिखाण केलं.
उत्तर द्याहटवासध्याचे परिस्थितीत ज्या प्रमाणे वेळेचा सदुपयोग करून लिखाणाचा छंद जोपासत आहेत तो खरच स्तुत्य आहे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.आजच्या नोकरीच्या ताणतणावयामध्ये तसेच आपल्यासह जगावर ओढवलेल्या आस्मानी संकटात आपले लेखन आम्हाला आमचे बालपणात घेऊन गेले व आमच्या भूतकाळातील सुखद आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल आपले आभार.
आशा करतो आपणाकडून असेच लेखन होत राहील आणि एक दिवस आम्हाला तुमचे एखादे चांगले पुस्तक वाचण्याची संधी मिळेल.
अनेक शुभेच्छांसह
दत्ता लोंढे
नक्कीच,आपल्यामुळे आणखी प्रोत्सहान मिळते
हटवाAtishay sunder anubhav.balpanicya aathavanila ujala milala.Jadhav sir tumchi mehanat manatil jidd preranadayi ahe.
उत्तर द्याहटवाखुप सुंदर .....
उत्तर द्याहटवा