![]() |
| लढा कोरोनाशी... |
चीन देशातील वुहान शहरात नोव्हेंबर-डिसेंबर 2019 च्या सुमारास या कोरोना विषाणूने डोकं वर काढलं व बघता बघता आज जगातील 229 देशाला बाधित करत 43 लाखाच्या घरात रुग्णाची भर पडली आहे व 3 लाखाच्या जवळ मृत्यू झाले आहेत.हा संसर्ग एवढ्या वेगात पसरला की भल्या भल्या महासत्ता देशाला याची खबर लागे प्रयत्न होत्याचे नव्हतं झालं.अमेरिका सारख्या देशाने तर कोरोनापुढे नांगी टाकली व आज ते फक्त परिणाम भोगत आहेत.कोरोनाने जगाला जसे बाधित केले तसे भारतात ही हवाई मार्गे 30 जानेवारी 2020 रोजी केरळ राज्यात थ्रीसुर येथे वुहान वरून आलेल्या मुलीला याची लागण झाली व देशात या महाभयानक संसर्गाची सुरवात झाली.ज्या केरळ राज्यात देशातील सुरवातीचे 3 रुग्ण आढळले त्या केरळ राज्याने कोरोनाचा धोका ओळखत सुरुवातीपासूनच उपयोजनेचे पाऊले टाकत या रोगाचा कसा मुकाबला करायचा याची आखणी सुरु केली व त्याचा असर म्हणजे पहिले तीन पैकी 3 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तेव्हापासून देशात केरळ पॅटर्नची चर्चा सुरु झाली व आजही आहे. केरळ प्रशासनाने अगदी उत्तम परीस्थित हाताळत राज्यात गावोगावी कोरोना बद्दल जनजगृती केली त्यात प्रशासकीय यंत्रणा,राजकीय पदाधिकारी यांनी राज्यातील जनतेला कोरोना बद्दल माहिती देत जनजागृती केली.सुरवाती पासूनच केरळ सरकारनने देशाच्या पुढे जात कांही निर्णय घेतले. देशात 14 दिवसाचा quarantine कालावधी असताना केरळमध्ये 29 दिवसाचा केला व आजही तेथे हाच नियम सुरु आहे. ज्या व्यक्तीला quarantine केले त्या व्यक्तीची सतत माहिती प्रसाशनाने ठेवली व त्यांची काळजी घेतली तर दुसऱ्या बाजूला जनसमान्यात जनजागृतीचे काम तेवढ्याच जोमाने सुरु होते. 15 मार्च पासून जागो जागी हँड वॉश स्टेशन उभारून ब्रेक द चैन हे घोषवाक्य देऊन सुरवात केली. केरळमध्ये प्रति 10000 व्यक्तिमागे ज्युनियर पब्लिक हेल्थ नर्स व 15000 हजार व्यक्तिमागे ज्युनियर हेल्थ इन्स्पेक्टर ची नेमणूक करत आरोग्य यंत्रणा सक्रिय केली.केरळ सरकारने भरपूर चाचण्या केल्या व हजारो जणांना quarantine करत 29 दिवस एकांतात ठेवले. या काळात जनतेला व रुग्णांना मानसिक आधारची गरज असते हे ओळखून रुग्णांच्या समोपदेशनावर केरळने भर दिला. मुळात केरळमध्ये आरोग्याच्या बाबतीत वर्षानुवर्षे काळजी घेतलीच जाते व तेथे सतत येणारे नैसर्गिक संकटामुळे केरळचे आपत्तीव्यवस्थापन सक्षम असल्याने कोरोना काळात या अनुभवाचा चांगलाच फायदा झाला. केरळ मधील असलेले नैसर्गिक वातावरण,लोकांचे आहार,आयुर्वेदिकचा वापर यामुळे तेथील लोकांची प्रतिकारशक्ती मुळातच चांगली आहे.आज आपण कोरोना होऊ नये म्हणून गरम व कोमट पाणी पीत आहोत पण केरळमध्ये वर्षानुवर्षे बहुतांश लोक थंड पाणी पीत नाहीत व तेथील लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे अशा अनेक कारणाने केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखला जात आहे.
केरळमध्ये पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला तर पहिला मृत्यू 22 मार्च 2020 ला झाला यावरून आपण समजु शकतो केरळमध्ये कशा प्रकारे परिस्थिती हाताळली जात आहे.या साडेतीन महिन्यात केरळमध्ये फक्त 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 524 पैकी 489 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.म्हणजे केरळमध्ये रुग्ण बरे होऊन जाण्याची टक्केवारी 93.32% एवढी तर मृत्यू टक्केवारी 0.76% एवढी आहे.केरळ राज्यातील 2 जिल्हे रेड झोन,10 जिल्हे ऑरेंज झोन व 3 जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत तर 9 मे नंतर परदेशातून आलेल्या प्रवाश्यापैकी 32 जणांना कोरोनाचा लागण झाली असून त्यांना quarantine करण्यात आले आहे. कोरोना विरुद्ध अशी लढाई देशात कुठल्याही राज्याने अथवा जगात कुठल्याही देशाने दिली नाही म्हणून आज सर्वत्र कोरोनाच्या केरळ पटर्नची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे.
आता आपण कांही आकडेवारी पाहूयात. जग,भारत,महाराष्ट्र व केरळ यांच्यातील विश्लेषणात्मक आकडेवारी पाहून आपल्याला नक्की अंदाज येईल की केरळ राज्य कोरोना लढ्यात किती अग्रेसर आहे.
13 मे 2020 पर्यन्त जगात 43,08,055 एवढे लोक कोरोना बाधित झाले आहेत त्यातील 15,18,424 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 24,95,476 रुग्ण आजही ऍक्टिव्ह आहेत यात 2,94,155 जणांचा मृत्यू झाला आहे.जगाची रुग्णाची बरे होण्याची टक्केवारी 35.24%तर मृत्यूचे प्रमाण 6.82% एवढे आहे.आता आपण भारतातील आकडेवारी पाहूया 13 मे पर्यंत देशात 74281लोकांना लागण झाली 24386 बरे झाले,47480 ऍक्टिव्ह आहेत तर 2425 जणांचा मृत्यू झाला.म्हणजे भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 32.82% तर मृत्यूचे प्रमाण 3.26% एवढे आहे.
आपल्या महाराष्ट्रात 9मार्च 2020 ला पहिला रुग्ण सापडला व 13 मे पर्यन्त हा आकडा तब्बल 24427 इथपर्यंत पोहोचला. राज्यात 5125 लोक बरे झाले तर 18381 रुग्ण आजही ऍक्टिव्ह आहेत तर 921 जणांनाचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला मृत्यू 17 मार्च 2020 ला झाला होता तर यावरून लक्षात येईल जवळपास दोन महिन्यात हजाराच्या घरात बळींची संख्या पोहचली आहे.आपण महाराष्ट्राची टक्केवारी पाहिली तर रुग्ण बरे होण्याचा दर 20.98% तर मृत्यूचा दर 3.77% आहे म्हणजे देशाच्या सरासरीचा विचार केल्यास आपलं राज्य देशाच्या पुढे आहे त्यामुळे पुढील काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे व मीच माझा रक्षक या प्रमाणे वागलं पाहिजे.
आता आपण कोरोना विरुध्द यशस्वी लढा देत असलेल्या केरळ राज्याची आकडेवारी पाहूया. 13 मे पर्यन्त केरळमध्ये 524 जणांना कोरोना झाला त्यापैकी 489 रुग्ण बरे झाले तर फक्त 4 जणांचा मृत्यू झाला.आपण केरळच्या सरासरीचा विचार केला तर देशात काय जगात अव्वल कामगिरी ठरावी अशी आकडेवारी आहे, केरळमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 93.32% एवढा जबरदस्त आहे.तर मृत्यू दर 0.76% एवढा आहे. वरील सर्व विश्लेषण पाहिल्यास आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षात येईल की केरळसारख्या राज्याने जो कोरोना विरुद्ध लढा दिला आहे तो देशासाठी व जगासाठी निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय ठरणारा आहे....
✍🏻..
*श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*प्राथमिक शिक्षक,ता.रोहा* *जि.रायगड.*
*09923313777*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा