![]() |
| निसर्ग शिक्षणाचा आनंद घेताना आमचे मुलं |
माझी शाळा डोंगर भागातील शाळा, शाळेत 59 विध्यार्थी सर्व पालक मजुरी करून गुजराण करणारे व दोन वेळच्या जेवणाच्या शोधात राहणारे,अँड्रॉईड सोडा जेमतेम 3 ते 4 पालकांकडे साधे मोबाईल आहेत,95% पालक निरक्षर, 58 विध्यार्थी कातकरी बोलीभाषिक,अनेक पालक झोपडीत राहतात,आदिवासीवाडीत 4G,3G सोडा साध्या रेंजची ही मारामार अशा स्थितीत कोरोनाने देशाला,राज्याला गाठले व शाळेला अघोषित सुट्टी पडली, इकडे राज्यात शाळा बंद पण शिक्षण सुरु ही मोहीम जोरदार सुरु झाली घरोघरी पालकांच्या मोबाईलवर मुलं आपल्या गुरुजींनी दिलेला अभ्यास करत होते,यूट्यूब वर व्हिडीओ बघत होते,online टेस्ट सोडवत होते तर दुसऱ्या बाजूला माझ्या शाळेतील मुलांचा दिनक्रम सकाळी उठणे, जंगलात भटकणे,नदीवर पोहायला जाणे,गलोल घेऊन पक्षी,प्राण्यांची शिकार करणे,झाडावर चढणे, रानंमेव्याचा आस्वाद घेणे, चुलीत जाळण्यासाठी लाकडं गोळा करणे,पक्षासारखं बागडने असा रानंपाखरांचा online अभ्यास सुरू होता. एका बाजूला अँड्रॉईडवाले मुलं भराभर मोबाईलवर गणिते सोडावीत होते बेरीज ,वजाबाकी करत होते तर आमचे मुलं गलोलने किती दगडात किती आंबे पाडले हे शिकत होते.अँड्रॉईडवाले मुलं यूट्यूबवर निसर्ग,जंगल,पाणी,नद्या,फुलपाखरू,रानफळ,जंगली पशुपक्षी पाहत होते तर तेच आमचे मुलं रानावनात भटकून त्याचा प्रत्येक्ष अनुभव घेऊन शिक्षण घेत होते. Online अभ्यास करणारे मुलं दिवसभराचा अभ्यास गुरुजी कडून दररोज संध्याकाळी whatsapp ग्रुप वर तपासून घेत होते तर आमचे मुलं दररोज संध्याकाळी घरकामात आई वडिलांना त्यांच्या मदत करत,आजीआजोबा सोबत गप्पा मारत आकाशातील चांदण्या मोजत, दुकानातील वस्तू आणून त्याचा हिशेब करत आपल्या ज्ञानाचे उपयोजन करत होते.
सांगायचं एवढंच की शिक्षण हे कधीच थांबत नाही ते सतत चालूच असते फक्त त्याचे माध्यम वेगवेगळे असते.शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे नसून ते आपण दररोज जीवनात कशा प्रकारे जगतो ते शिक्षण अभिप्रेत आहे. आज जरी माझ्या शाळेतील मुलांना अँड्रॉईड मोबाईलवर online शिक्षण घेता येत नसले तरी ते निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन शिक्षण घेत आहेत.या लॉकडाऊन काळातील मुक्त शिक्षणातून आमची मुलं जलतरण,नेमबाजी,धावणे,हस्तकला,चित्रकला,नृत्यकला,यात पारंगत होऊन भविष्यात आपले करियर घडवू शकतील. आमच्या मुलांसाठी कोरोना काळात हेच अनुभवातून मिळालेले निसर्गशिक्षण त्यांच्या पुढील वाटचालीस गती देणारे ठरेल...
✍🏻...श्री गजानन पुंडलिकराव जाधव
प्राथमिक शिक्षक,जि प रायगड.
09923313777
gajanan.jadhav1984@gmai.com

Great Job sir
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर आपले मार्गदर्शन आईच लाभो
हटवाKharay ....aani mast.
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर गजानन. छान केलंस हे लिहून. आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची, पालकांची परिस्थिती, त्यांचे जागण्याचे प्रश्न सर्वांसमोर येणे गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवानक्कीच ताई,दुर्गम भागातील वास्तव समोर आले पाहिजे
हटवाआगदी खर आहे मित्रा.खेडयापाडयावरील लोकांना दोन वेळेच जेवण लवकर मिळत नाही आणि onlineशिक्शनासाठी मोबाईल कुठून मिळेल.
उत्तर द्याहटवा