 |
| शिक्षकांची कोरोना विरोधी लढ्यात भूमिका... |
राज्यात शिक्षकांची भूमिका आज घडीला जिथे कमी तेथे आम्ही याप्रमाणे संकटकाळी राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर अशी झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना काळात खडू डस्टर सोडून हातात काठी, टोपी, इन्फ्रारेड थर्मोमीटर गन, शिक्के घेऊन डॉक्टर,पोलीस,आरोग्य कर्मचारी यांच्यावर येत असलेल्या तान लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला आमचा शिक्षक बांधव खांद्याला खांदा लावून 24×7 वेळेत कार्य करत आहे. राज्यातील पोलिसांसोबत चेक पोस्टवर बंदोबस्त असो की आरोग्य खात्यासोबत आरोग्य तपासण्या असो की ग्रामस्तरावर home quarantine करणे असो की जनतेत कोरोना संसर्गाबाबत जनजागृती असो आमचे शिक्षक बांधव सदैव सेवेशी तत्पर आहेत. अशा स्थितीत अनेक ठिकाणी चेक पोस्टवर शिक्षकांवर प्रवाश्यांचे हल्ले झाले,खालच्या पातळीवर बोलणे ऐकून झाले,वार्डा वार्डात माहिती घेताना वेगळ्या खोचक नजरेने पहिले गेले,गावा गावात रोशाला सामोरे जावे लागले तरी गेल्या दोन महिन्यांपासून आमचे बांधव विनातक्रार कार्य करत आहेत.अनेक शिक्षकांनी पन्नाशी ओलांडली आहे तर अनेक तरुणांना हक्काची पेन्शनही नाही तरी आपल्या जीवाची पर्वा न करता या कोरोना काळात लढत आहेत.मागच्या आठवड्यात सांगलीचा तरुण शिक्षक श्री कोरे यांचा चेकपोस्टवर ऑन ड्युटी असताना कर्तव्य बजावत असताना ट्रकने चिरडले व त्यात त्याचा मृत्यू झाला तर एक मुंबई मधील शिक्षक कोरोना ड्युटी करून घरी जाताना अपघातात मृत्यू पावला. आज राज्यातील आमचा शिक्षक कोणत्याही अपेक्षे शिवाय राष्ट्रकार्य करत आहे फक्त शासनास एकच माफक मागणी आहे की या कोरोना योध्याचा किमान विमा तरी सरकारनी उतरवावा.आज कुठलेही विमा संरक्षण नसताना शिक्षक काम करत आहे,त्याच्या बाबतीत कांही घडल तर त्याच्या कुटुंबाला कुठल्याच बाबतीत शासनाकडून संरक्षण नाही.कांही दिवसापूर्वी दिल्लीत कोरोना ऑन ड्युटी मध्ये कार्य करत असलेल्या शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर दिल्ली सरकारने त्याला 1 कोटी रुपयांची मदत केली. आपल्या राज्यात कांही दिवसापूर्वी श्री कोरे यांचा ऑन ड्युटी मृत्यू झाला तो प्राथमिक शिक्षक 2005 नंतर सेवेत रुजू झालेला त्याला तर पेन्शन ही नव्हती व कोरोना काळातील कसल्याच प्रकारचे विमा संरक्षण ही नव्हते अशावेळी घरातील कमवता व्यक्ती निघून गेल्यास त्याच्या कुटुंबावर काय संकट ओढवले असेल याचा विचार शासनाने केला पाहिजे.आज पोलीस,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांना सरकारने विमा संरक्षण दिले आहे मग शिक्षकालाच का वगळले हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.राज्यात आज मुंबई ,कोकणातील रेड झोन असो की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील ऑरेंज झोन असो अथवा खान्देश,विदर्भातील ग्रीन झोन असो चांदया पासून बांद्या पर्यन्त प्रत्येक जिल्ह्यात आमचा शिक्षक बांधव कोरोना युद्धात तत्परतेने कार्य करत आहे व आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे.राज्यातील पोलीस यंत्रणा,आरोग्य यंत्रणा,महसूल यंत्रणा यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना विरुद्ध लढा देत मदत करत आहे. राज्यात 3 मे नंतर मुंबई पुण्यातील शहरी भागातील लोक आप आपल्या गावी परतत आहेत व अशा स्थितीत कोकणात,पश्चिम महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्याने चाकरमानी गावी येत आहेत त्यामुळे आज गावोगावी चिंतेचे व भीतीचे वातावरण तयार झाले आहे,अनेक ठिकाणी ग्रामस्थांमध्ये जुने व नवे असे वाद होऊ लागले आहेत अशा स्थितीत पोलीस यंत्रनेवर खूप मोठा ताण येत आहे हे पाहून आमचे शिक्षक बांधव आपआपल्या नोकरीच्या गावी तळ ठोकून लोकांमध्ये समनव्य घडवून आणत आहेत व एकोपा कसा टिकेल यासाठीही प्रयत्न करत आहेत,अशा असंख्य पडद्यामागच्या भूमिका पार पाडत *जिथे कमी तेथे आम्ही* या ब्रिदवाक्य प्रमाणे देशसेवा करून माझा शिक्षक बांधव आज आपले कर्तव्य पार पाडत आहेत...
✍🏻...
श्री गजानन पुंडलिकराव जाधव
प्राथमिक शिक्षक,
रोहा,जि.रायगड
9923313777
 |
| कल्याण डोंबिवली महानगरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतील शिक्षक बांधव |
 |
| मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चेक पोस्टवर शिक्षक बांधव |
 |
| गावा गावात home quarantine करताना शिक्षक |
खूप छान,,
उत्तर द्याहटवा👌👌
खूप छान
हटवाखूपच छान पत्रकारांनी शिक्षकांची बाजू शासनदरबारी मांडावी ही रास्त अपेक्षा
उत्तर द्याहटवाबिकट परिस्थिती आहे
उत्तर द्याहटवा